आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबनावट कागदपत्रे व मालकाच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून जमिनीची विक्री केल्या प्रकरणात आठ आरोपींपैकी एकाला चिकलठाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गणेश देवडिगा (३५, रा. विशालनगर, गारखेडा) असे आरोपीचे नाव असून त्याला ६ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. भंडे यांनी दिले.
चंद्रकांत गणपतराव निकम (६८, रा. प्लॉट क्र. ६, बजरंग चौक, एन-५ सिडको) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादीची गेवराई तांडा येथे गट क्र. २४ मध्ये ७१.८१ गुंठे जमीन आहे. १९ जुलै २०२२ रोजी फिर्यादीला एका व्यक्तीने फोन करून तुम्ही जमीन विक्री केली का, असा प्रश्न केला, त्यावर फिर्यादीने नकार दिला. त्यावेळी त्या व्यक्तीने फिर्यादीला विक्री करारनामा व इतर कागदपत्रे पाठवली. फिर्यादीच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून बनावट आधार कार्डच्या आधारे व स्वाक्षरीच्या जागी अंगठा लावून जमीन गणेश देवडिगा याला विक्री केल्याचे निदर्शनास आले.
या व्यवहारात नीलेश थोरात (रा. कन्नड) याने नोटरी केली तर साक्षीदार म्हणून सत्यम मोतीराम नवगिरे आणि विजय नारायण राऊत (दोघे रा. औरंगाबाद) हे होते. आरोपींनी ६० लाख रुपयांत जमिनीचा व्यवहार केला. त्यातील ११ लाख रुपये इसार म्हणून निकम यांना दिल्याचे दाखवले.
पुढे ती जमीन गणेश देवडिगा याच्याकडून अझीम अश्फाक शेख (४९, रा. तुळजाई नगर, शिवाजीनगर, सातारा परिसर) याने खरेदी केली. त्याचे ८ लाख ४० हजार रुपये देवडिगा याला देण्यात आले. जमिनीची नोटरी सुनील दौंड याने केली, या व्यवहारात कुरेशी अखिल अहेमद खलील अहेमद कुरेशी (रा. दर्गा रोड, शहानूरवाडी) आणि शेख आसिफ (रा. बीड बायपास आमराई) हे दोघे साक्षीदार होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.