आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीचे आमिष दाखवत गरीब महिलेवर बलात्कार:महिलेची परराज्यात विक्री; चौघांना पोलिस कोठडी

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरीला अथवा कामाला लावून देण्‍याचे आमिष दाखवत गरीब महिलेवर बलात्कार करून तिचे परस्पर परराज्या‍तील व्यक्तीशी लग्न लावून विक्री केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चार आरोपींना १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. गुणारी यांनी दिले. हारुण खान नजीर खान (४०, रा. बिसमिल्ला कॉलनी, निसारवाडी), शबाना हारुण खान (३६, रा. बेरीबाग, हर्सूल), बन्सी मुलाजीराम मेघवाल (५०, रा. बोरानाडा, ता. जि. जोधपूर, राजस्थान) आणि लीलादेवी जेठराम मेघवाल (४२, रा. आरतीनगर पाल, बोरानाडा, ता. जि. जोधपूर राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात ३० वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपींना अटक करून झाली होती. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्या‍ची विनंती न्यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...