आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान बदल:तापाच्या पॅरासिटामॉलची विक्री 50 टक्के वाढली ; ओपीडीत 40 टक्के रुग्ण व्हायरलचे

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सर्वच दवाखान्यांच्या आेपीडीमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे ४० टक्के रुग्ण वाढले आहेत. तापाच्या पॅरासिटामॉलची विक्री ५० टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, अशा रुग्णांना दवाखान्यात भरती हाेण्याची गरज नाही, असे घाटीच्या मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले.

पावसाळ्यात सातत्याने हवामानात बदल हाेत असल्याने संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: ऑगस्टमध्ये अशा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.चार दिवसांत हाेतात बरे : खासगी दवाखान्यात सध्या साथीच्या आजारांवर उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सिडकोतील डॉ. पंकज देवळे म्हणाले, माझ्या ओपीडीमध्ये ७५ टक्के रुग्ण या आजारांचे आहेत. बहुतांश रुग्णांत ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे आहेत. चार दिवसात हे रुग्ण बरे होतात. त्यानंतर चार दिवस त्यांना अशक्तपणा जाणवतो. मात्र, या रुग्णांना दवाखान्यात भरती करण्याची गरज नाही. तसेच त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. जून, जुलैमध्ये वाढते गाेळ्यांची मागणी : पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकल्यांच्या गोळ्यांची मागणी वाढते. याविषयी केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव विनोद लोहाडे म्हणाले, ४० ते ५० टक्क्यांनी गोळ्यांची मागणी वाढली आहे. केमिस्ट अँड ड्रगिस्ट कार्यकारिणीचे सदस्य मनोहर कोरे यांनी सांगितले, जून-जुलैमध्ये या गोळ्यांची मागणी वाढते. ऑगस्टमध्ये सर्दी, खोकला, तापेच्या गोळ्यांची मागणी ५० टक्क्यांनी वाढलेली आहे.

गरम पाण्याने गुळण्या करा, मास्क वापरा : भट्‌टाचार्य यांनी सांगितले की अंगदुखी, डोकेदुखी, घसा दुखणे ही फ्लूची लक्षणे आहेत. तीन दिवस ताप राहतो. त्यानंतर चार ते पाच दिवस अशक्तपणा जाणवताे. दोन वेळा पॅरासिटामॉल आणि सर्दीची गोळी तसेच दिवसातून चार वेळा गरम पाण्याने गुळण्या केल्यास आराम पडताे. रुग्ण वाढत असल्यामुळे मास्कचा वापर करावा. त्यामुळे संसर्गजन्य आजार पसरत नाही. त्यामुळे पुढचे काही दिवस प्रत्येकाने मास्क वापरावा.

हवामान बदलामुळे फ्लूची साथ
डॉ. भट्टाचार्य म्हणाल्या, घाटीत येणाऱ्या रुग्णांमध्ये ४० टक्के सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे या आजाराचे आहेत. हा रूटीन फ्लू आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे रुग्णांची संख्या वाढते. या रुग्णांच्या संपर्कात आल्यास दुसऱ्यांना हा आजार जडताे. खोकला, शिंकेतून पसरणारा हा आजार आहे.

बातम्या आणखी आहेत...