आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयत्न:पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांना अभिवादन ; शिरीष मोरे यांनी दिला कार्याला उजाळा

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण तालुक्यातील बालानगर येथील सरस्वती भुवन प्रशालेत पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक राजेंद्र गायकवाड, फिरोज पटेल, मच्छिंद्र पाटील, नलिनी आमते, सीमा लखमल उपस्थित होते.

मुख्याध्यापक शिरीष मोरे यांनी गोविंदभाईंच्या कार्याला उजाळा दिला. अर्शद शेख, वेदिका गोर्डे, योगिता कोरडे, सोनाली गोर्डे, अनम शेख व वैष्णवी भालेकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. वैदेही गोर्डे व प्रांजल राऊत यांनी सूत्रसंचालन केले. भक्ती गोर्डे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...