आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद निवडणूक:समाजवादी पक्ष आता एकटाच लढणार ; शहराध्यक्ष फैसल खान घोषणा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाजवादी पक्ष आता कोणाशीही युती किंवा आघाडी करण्यासाठी फारसा इच्छुक नाही. त्या ऐवजी औरंगाबाद जिल्ह्यातील नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक एकटाच लढणार आहे. पक्षाचा मेळावा नुकताच मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात झाला. त्यात शहराध्यक्ष फैसल खान यांनी स्वबळाची घोषणा केली. ते म्हणाले की, सध्या औरंगाबाद शहर आणि देशात फक्त जातीयवादाचेच राजकारण सुरू आहे. त्यामुळे लोक त्याला कंटाळले आहेत. म्हणून आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहोत. या वेळी जिल्हाध्यक्ष जगदीश शिंदे, प्रदेश सचिव अखिल शेख, महासचिव अब्दुल रऊफ, अय्युब खान आदींनीही स्वबळाच्या नाऱ्याला पाठिंबा दर्शवला.

बातम्या आणखी आहेत...