आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा^ग्रामपंचायत निवडणुकीबाबत सरकारने पुन्हा याचिका दाखल केली. ओबीसी आरक्षणासह या निवडणुका घेण्याची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने ती फेटाळली. सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
याचिका टिकण्याची शक्यता नाही
^निवडणूक आयोगाचे कार्यालय दिल्लीतच स्थलांतरित करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्टीकरण मागण्यासाठी आयोगाने पुन्हा अर्ज केल्याने ही वेळ आली. फेरयाचिका केली तरी ती टिकण्याची शक्यता नाही.
- प्रा. हरी नरके, अभ्यासक
केंद्र, राज्याने गांभीर्याने पाहावे ^ओबीसींच्या वाट्याचा संघर्ष काही संपताना दिसत नाही. कोर्टाच्या निर्णयाचा आम्हाला मोठा धक्का बसला आहे. हा प्रश्न निकाली लागण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने पाहावे. समता परिषदही याचिका करणार आहे. - छगन भुजबळ, अध्यक्ष समता परिषद
मिळालेलं आरक्षण गमावलं | आमच्या याचिकेमुळे प्रक्रिया सुरू झाली आणि ओबीसींना आरक्षण मिळाले होते. त्यावर
निवडणूक आयोग पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे गेल्यामुळेच हा गोंधळ झाला. पुढे काय होते ते बघू - अशोक गवळी, याचिकाकर्ते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.