आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील विकसित राष्ट्रांत सर्व निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जातात. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी भारतातील सर्व आगामी निवडणुका मतपत्रिकेवरच घेतल्या जाव्यात. त्यासाठी समविचारी पक्षसंघटनांना एकत्रित करून लढा उभारला जाईल. निवडणूक आयोग व केंद्र सरकारकडेही आग्रही मागणी केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोकण शिक्षण आणि पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकांत महाविकास आघाडीला विजय मिळाला. भाजपने फक्त एक जागा जिंकली. नागरिक महागाई, करप्रणाली, चुकीच्या धोरणांमुळे सत्ताधारी भाजपला कंटाळले आहेत. ही निवडणूक मतपत्रिकेवर झाल्यामुळे यामध्ये कुठलाही घोळ दिसत नाही. त्यामुळे येथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुका या मतपत्रिकांवरच घेतल्या जाव्यात, अशी मागणी डॉ. भानुसे यांनी केली आहे.
ईव्हीएमला विश्वासार्हता नाही ईव्हीएम कधीही बंद पडू शकते. त्यात फेरफार करून मते वळवणे शक्य आहे, असे आम्हाला वाटते. नागरिक त्रस्त असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकांत भाजपचा पराभव झाला. नागपूरच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे आगामी निवडणुकी मतपत्रिकेवरच घ्याव्यात, यासाठी लढा उभारणार असे डॉ. भानुसे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.