आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीचे फायदे:संभाजी ब्रिगेडला 3 नगरसेवकपद, गंगापूरची उमेदवारी मिळणे शक्य, उद्धवसेनेमुळे ब्रिगेडला मिळेल सत्तेत भागीदारी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजी ब्रिगेड शिवसेना आघाडीचा औरंगाबाद जिल्ह्यातील राजकारणावर नेमका काय परिणाम होईल, याची चाचपणी केली असता आगामी महापालिका निवडणुकीत ब्रिगेडचे तीन नगरसेवक उद्धव सेनेमुळे निवडून येतील. गंगापूर-खुलताबाद या मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारीही मिळेल. या मोबदल्यात उद्धवसेनेला आक्रमक प्रचारक मिळेल. तर राष्ट्रवादीच्या हक्काची काही मते उद्धव सेनेला मिळतील,असे चित्र समोर आले आहे.

दिव्य मराठी प्रतिनिधीने सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच राजकीय घटना घडामोडींच्या अभ्यासकांशी चर्चा केली. तेव्हा असे समोर आले की, शिंदेसेनेचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले असले तरी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात उद्धवसेनेची शक्ती आहे. अनेक वसाहतींमध्ये उद्धव सेनेकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. दुसरीकडे हर्सूल, हडको एन-११, एन-१२, एन-९ येथे संभाजी ब्रिगेडची विचारधारा मानणाऱ्या मतदारांची संख्या लक्षणीय झाली आहे. लोकसभा २०१९च्या निवडणुकीत त्याची पहिली चुणूक दिसली. म्हणून तेथे संभाजी ब्रिगेडला फायदा होईल. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची रणनिती लक्षात घेतली तर गंगापूर विधानसभेत संभाजी ब्रिगेडचा उमेदवार असेल.

राष्ट्रवादीच्या हक्काची काही मते उद्धवसेनेला मिळतील

२०१७मध्ये ब्रिगेडचे संजय जाधव यांना शिक्षक मतदारसंघात ११९ तर राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांना २५,२८८ मते मिळाली होती. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डाॅ. शिवानंद भानुसे म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादीनेे आमचा वापर केला. आम्ही सत्तेसाठी आघाडी केली आहे.

एमआयएमशीही युती होईल : केणेकर

भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले की, एक दिवस उद्धवसेनेची एमआयएमशीही युती होईल. संभाजी ब्रिगेड-शिवसेना आघाडीमुळे औरंगाबाद जिल्ह्यात भाजपला काहीही फरक पडणारनाही. उद्धवसेनेचे महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या मते आघाडीमुळे हिंदुत्व अधिक बळकट होईल.

बातम्या आणखी आहेत...