आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:संभाजीराजे 2 सप्टेंबरला घेणार राष्ट्रपतींची भेट; मराठा आरक्षणाचा प्रश्न विधायक मार्गाने सोडवण्यावर होणार चर्चा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वपक्षीय खासदारांच्या प्रत्येकी एक प्रतिनिधीने उपस्थित राहण्याचे आवाहन

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकाटीप्पणी सुरुच आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून मराठा समाजाला हे आरक्षण देण्यात आले. आजी माजी मुख्यमंत्र्यांनी इतर प्रवर्गाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. सदरील प्रश्न विधायक मार्गाने कायमस्वरूपी सोडवण्यासाठी खासदार संभाजीराजे 2 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींनी भेटण्यासाठी वेळ दिली असून सर्वपक्षीय खासदारांच्या प्रत्येकी एक प्रतिनिधीने यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.

मराठा समाजातील 70 टक्के लोक हलाकीचे जीवन जगज आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी गेले अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. आंदोलन, मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधले गेले व आजही स्वत संभाजीराजे महाराष्ट्रात मेळावे घेऊन राज्य व केंद्र सरकारला मराठा आरक्षण द्यावे म्हणून निर्वाणीचा इशारा देत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना सरकारने सर्वेक्षण व आयोग स्थापन करून आरक्षण दिले होते. पण ते कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याने सांगत सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द ठरवले आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम असून तो विधायक मार्गाने सोडवण्यासाठी थेट राष्ट्रपतींशी चर्चा करून काय करता येईल, यासाठी संभाजीराजेंनी वेळ मागितला होता. त्यानुसार 2 सप्टेंबरला ही भेट ठरली आहे. यात सर्व पक्षीय प्रत्येक एक खासदारांनी सहभागी व्हावी, यासाठी संभाजीराजेंनी पत्र पाठवले आहे. तर या बैठकीकडे सर्व मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...