आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी:वैद्यकीय प्रवेशासाठीचा 70:30 चा फॉर्म्युला रद्द करा, संभाजी सेनेचे आमदारांच्या घरासमोर गोंधळ आंदोलन

परभणी8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पावसाळी अधिवेशनाच्या सभागृहांमध्ये मराठवाड्यातील सर्व आमदारांनी हा विषय लावून धरण्याची मागणी

वैद्यकीय प्रवेशासाठीचा 70:30 चा फार्म्युला रद्द करण्याच्या मागणीसाठी 7 सप्टेंबरला सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या सभागृहांमध्ये मराठवाड्यातील सर्व आमदारांनी हा विषय लावून धरावा. यासाठी आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी सेनेच्या वतीने शनिवारी (दि.5) परभणी जिल्ह्यातील आमदारांच्या निवासस्थानासमोर गोंधळ आंदोलन करण्यात आले.

संभाजी सेनेच्या वतीने गेली अनेक वर्षापासून या प्रश्नावर धरणे, मोर्चे, उपोषणे इत्यादी प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये यापूर्वी वेळोवेळी मोर्चे काढले आहेत, याच मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने 16 मार्च 2020 रोजी मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार होते. परंतु, कोरोनाच्या संसर्गामुळे आंदोलन रद्द करण्यात आले. 13 सप्टेंबर रोजी नीट ची परीक्षा होत असल्याने आणि 7 तारखेला सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या सभागृहांमध्ये मराठवाड्यातील सर्व आमदारांनी हा विषय लावून धरावा आणि मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रवेशासाठी न्याय द्यावा, या मागणीसाठी आमदारांच्या घरासमोर संभाजी सेनेच्या वतीने गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले.

परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील, जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर, गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या घरासमोर गोंधळ आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जिल्हा संपर्कप्रमुख नारायण देशमुख, मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन लव्हाळे, शहराध्यक्ष अरुण पवार, जिल्हा संघटक विजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सतीश जाधव, विद्यार्थी शहराध्यक्ष सोनू पवार, पवन कुरील, रवि तांबे, माधव थीटे, डॉ. उद्धव देशमुखसह गोंधळींचा सहभाग होता

बातम्या आणखी आहेत...