आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आरटीओ विभागाने वाहन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तीन दिवसांत ५६० वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६७ वाहने अनफिट होते. अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन आरटीओ पथकातील अधिकाऱ्यांनी चालक मालकांचे समुपदेशन करून ही वाहने परत पाठवली. तसेच योग्य उपाययोजना करूनच वाहन रस्त्यावर चालवावे, अशी ताकीदही देण्यात आली आहे.
समृृद्धी महामार्गामुळे मुंबई नागपूर मार्गावरील शहरांत ये जा करण्याचा वेळ कमी झाला आहे. मात्र, वाहनांची तपासणी न करता वेगात चालवली जातात. त्यामुळे भीषण अपघात होऊन मृृत्यू मुखी पडण्याचे व गंभीर जखमी होऊन कायमचे अपंगत्व येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
सर्वस्तरावरून उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. आरटीओ प्रशासनाने १० एप्रिलपासून दहा दिवस वाहन तपासणी व चालकांचे समुपदेशन करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत तीन दिवसांत पाचशेआडवतीस वाहनांची तपासणी केली. त्यापैकी सदुसष्ट वाहने समृद्धी महामार्गावर चालण्यासाठी योग्य नव्हती. त्यामुळे चालकांचे समुपदेशन करून वाहने माघारी पाठवण्यात आली. २० एप्रिलपर्यंत वाहन तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे आरटीओ विजय काठोळे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
समृद्धी महामार्ग वेरूळ टोल प्लाजा
१२ एप्रिल रोजी टायर तपासणी करतेवेळी सदर वाहनातून इंजिन मधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. वाहनास परत पाठवून वाहन चालकास धुरामुळे संभाव्य धोके निदर्शनास आणून वाहनाचे तात्काळ दुरुस्ती काम करून घेण्यास सांगितले. समोवानि ऐश्वर्या कराड व स्वप्नील ओहोळ हे उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.