आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचा आरोप:आयशरच्या अपघातामुळे समृद्धी महामार्ग ठप्प

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गावर मंगळवारी (२० डिसेंबर) सिंदखेडराजा येथे रस्त्यावर टायर फुटल्याने आयशर रस्त्यावर आडवे झाल्यानंतर वाहनांची दोन तास दोन किलोमीटर एवढी मोठी रांग शिर्डीकडे येण्यासाठी लागली होती. मदत करणारे पथक वेळेवर येऊ शकले नाही. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर मदत मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर घटनास्थळी हजर होते. त्यांनी याबाबत सांगितले की, समृद्धी महामार्ग नव्याने सुरू झाला असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनची टीम घटनास्थळी हजर होत नाही. आयशरची बॉडी तुटल्यामुळे त्याचे दोन भाग झाले. त्यानंतर पाऊण तासाने क्रेनच्या साहाय्याने आयशर बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात दोन तास लागले.

बातम्या आणखी आहेत...