आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:छत्रपती संभाजीनगरजवळ केमिकलने भरलेला टँकर पुलावरून कोसळला, चालकाचा जळून मृत्यू

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
केमिकलने भरलेल्या ट्रकचा अपघात होताच त्याने भीषण पेट घेतला. - Divya Marathi
केमिकलने भरलेल्या ट्रकचा अपघात होताच त्याने भीषण पेट घेतला.

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे. आज पहाटे छत्रपती संभाजीनगरजवळील फतियाबाद परिसरात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.

चालकाचा जळून कोळसा

केमिकलने भरलेला ट्रक अचानक समृद्धी महामार्गावरील पुलावरून खाली कोसळला. ट्रकमध्ये ज्वलनशील केमिकल असल्याने ट्रक कोसळल्यानंतर ट्रकला भीषण आग लागली. या आगीत ड्रकमधील ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. तसेच, केमिकलचा ट्रकही पूर्णपणे जळाला. दरम्यान, या ट्रकमध्ये किती जण होते?, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे.

चालकाचे नियंत्रण सुटले

ट्रक अचानक पुलावरुन खाली कसा कोसळला?, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पुलावर चालकाचते वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

नागपुरात पिकअप व्हॅनचा अपघात

दुसरीकडे, आज नागपूरमध्येही समृद्धी महामार्गावर पिकअप व्हॅनचा अपघात झाला आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. सोलापूर येथून द्राक्षे भरून गोंदियाला हा पिकअप व्हॅन निघाला होता. पहाटे पाच वाजता समृद्धी महामार्गावरून खाली उतरताना गाडी झिरो पॉईंट गार्डनमध्ये घुसली. त्यामुळे वाहनचालक तसेच गाडीत बसलेल्या आणखी एकाला इजा झाली.

बातम्या आणखी आहेत...