आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:आता ठाकरे गटात उरलेले आमदारदेखील आमच्याकडे येणार; मंत्री संदीपान भूमरे यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आमच्या बाजूने लागला आहे त्यामुळे हे सरकार आता स्थिर असून एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत त्यामुळे आता कोण काय बोलते याला काहीच अर्थ नाही, असे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी म्हटले आहे.

अनिल परब काय बोललेत त्याला काही अर्थ नाही एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार यांचा कुठलाही धोका राहिला आता नाही बाळासाहेबांच्या विचारांनी हे सरकार चाललेला आहे .उद्धव ठाकरे यांच्या गटाला आता कुठलेही भवितव्य राहिलेले नाही. त्यांचे आमदार आता सळो की पळो करून सोडतील आणि ते पुन्हा शिंदे गटाकडे येतील, सा दावा रोहमंत्री संदिपान भुमरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे गटातील जे लोक रोज सांगत होते की आता हे सरकार पडणार आता काही दिवसाचा आहे आता काही तासाचा आहे त्यांना या न्यायालयाच्या निर्णयामुळे झटका बसला आहे अनेक लोक हे सरकार पडावे म्हणून पाण्यात देव ठेवून बसलेले होते तर काही लोक यज्ञ करीत बसले होते आम्ही मात्र लोकांचे काम करत होतो त्यामुळे लोकांची आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत अशी टीका संदिपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्या पूजेवर केली आहे.

नैतिकतेचा विषय नाही न्यायालयाने निकाल दिला आहे मुंबई म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला दिलासा दिला आहे त्यामुळे जे लोक नैतिकतेचा विषय सांगत आहेत त्याला आता काहीही अर्थ उरला नसल्याचे भुमरे यांनी स्पष्ट केले. या निकालामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र जल्लोष केला जात आहे जनतेच्या हिताचे काम करणारे हे सरकार असल्याची माहिती यावेळी भुमरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे