आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकरी आपल्या राज्याचा कणा आहे. जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी 119 गावांची निवड करण्यात आली आहे. आराखडा करण्याचे काम प्रगतीपथावर असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या हस्ते ‘देवगिरी मैदान’ पोलिस आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला. त्यावेळी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, विक्रीकर सहआयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया, उपस्थित होते.
शेतकऱ्यांना वेळेत करा कर्ज पुरवठा
भूमरे म्हणाले की, यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने आता ‘सततचापाऊस’ ही बाब सुद्धा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली आहे. एवढेच नव्हे, तर अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा फटका आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. अशा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने वेळो वेळी तातडीने मदत जाहीर केली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा या करिता 15 एप्रिल ते 15 जून 2023 दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ‘शासकीय योजनांची जत्रा’हा अभिन व उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील 75 हजार नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
मनरेगाचा निधी वाढवला
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राज्याचा मागील वर्षाचा खर्च रुपये 2400 कोटी होता. तो यावर्षी 3400 कोटी करण्यात आलेला आहे. मनरेगाअंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजना घोषित केली असून 1 किलो मीटर कामासाठी रुपये 24 लक्ष अनुदान देण्यात येते.
राज्यामध्ये जवळपास 38 हजार किलो मीटर रस्ते मंजूर केलेले असून त्यापैकी आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 4000 किलो मीटर रस्ते मंजूर केले आहे. जिल्ह्याचा मागच्या वर्षीचा खर्च 99 कोटी रुपये होता. तो या वर्षी 170 कोटी झालेला आहे.राज्यात खर्चानुसार आपल्या जिल्हाचा 5 वा क्रमांक आहे.वृक्ष लागवडी मध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेली असून राज्यामध्ये देखील आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.