आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत खैरे म्हणजे संपलेला विषय:तो पुन्हा - पुन्हा उगळण्यात काहीही अर्थ नाही; मंत्री संदीपान भुमरेंची टीका

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत खैरे म्हणजे संपलेला विषय आहे. तो पुन्हा-पुन्हा उगळण्यात काहीही अर्थ नाही. आता शहराचा विकास जिल्ह्याचा विकास यावर चर्चा झाली पाहिजे. पुन्हा-पुन्हा तेच आरोप आणि त्याच प्रतिक्रिया यावर लोकही कंटाळलेले आहे. आम्हाला काहीही म्हणा आम्हाला फरक पडत नाही, या शब्दात पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैर यांच्यावर हल्लाबोल केला.

आता खैरे यांनी आम्ही जो विकास करतो, तो फक्त पहावा, असा सल्लाही संदीपान भुमरे यांनी दिला. पालकमंत्री झाल्यानंतर भुमरे हे पहिल्यांदा स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते बोलत होते.

तीस वर्षे लोकांनी खैरेंना निवडून दिले. मात्र, त्यांनी शहराचे वाटोळे केले. मी वार्डा-वार्डात जातो आहे. त्या ठिकाणी अनेक समस्या आम्हाला दिसत आहेत. या सोडवण्यासाठी आता आम्ही काम करायला सुरुवात केली आहे. जनतेचा त्याला चांगला प्रतिसाद ही मिळतो आहे. त्यांच्यासमोर काही विकासाचा अजेंडाच नाही. त्यामुळे कायम आम्हाला टार्गेट करून ते बोलत राहतात. त्यामुळे खैरे हा विषय आता आमच्यासाठी संपला आहे. त्यांचं नाव काढणे सुद्धा आता आम्हाला उचित वाटत नाही, असे भुमरे म्हणाले.

सभेतून लोक उठूलेच नाहीत

शेकडो किलोमीटरचा अंतर पार करून लोक फक्त एकनाथ शिंदे साहेबांची सभा ऐकायला आले होते. सात आठ तास बसल्यानंतर थोडीफार हालचाल होतेच. त्याला लोक निघून जाणे असे म्हणत नाही. ऐतिहासिक अशी सभा झाली त्यामुळे अनेकांचे डोळे मोठे झाले आहेत, असेही भुमरे यावेळी म्हणाले. शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट बीकेसी मैदान आहे. शेवटच्या माणसाला व्यासपीठ दिसत नव्हते. एवढी गर्दी या ठिकाणी होती. जेवढे लोक मैदानावर होते तेवढेच बाहेर होते, असेही भुमरे म्हणाले.

शिंदे आमचे पक्षप्रमुख

एकनाथ शिंदे शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्याचा दावा करीत आहे, असा प्रश्न भुमरेंना केला असता, ते म्हणाले, हो आमचीच खरी शिवसेना आहे. ते आमचे प्रमुखच आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करतो आहे. त्यामुळे ते आमच्यासाठी पक्षप्रमुखच आहे, असा दावाही संदीपान भुमरे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...