आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातिथी:मुकुल मंदिर विद्यालयात साने गुरुजी पुण्यातिथी ; साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको एन-७ येथील मुकुल मंदिर माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुकुलहार संस्थेचे कृष्णा व निर्मल ग्यानानी यांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार साने गुरुजी पुण्यतिथीच्या दिवशी शाळेला सुरुवात झाली. सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत डिश, रिंग, लगोरी, मामाचे पत्र हरवले आदी खेळ मुलांनी खेळले. मुख्याध्यापक जयंत चौधरी, सुरेश परदेशी यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. अर्चना दीक्षित व संपदा सुरडकर यांनी प्रार्थना सादर केली. प्रास्ताविक आशा राठोड यांनी केले. सूत्रसंचालन संजय पवार तर आभार स्नेहल बोरसे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...