आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुल्क वसूल करणार:संग्रामनगर उड्डाणपुलाच्या देखरेखीचे शुल्क वसूल करणार

छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संग्रामनगर उड्डाणपुलाच्या देखरेखीचे शुल्क मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वसूल करणार आहे. उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे कामदेखील याच विभागाकडून करून घेतले जाणार आहे. बीड बायपास रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्यावरील एका उड्डाणपुलाच्या कामासाठी संग्रामनगर उड्डाणपूल महिनाभरापासून बंद आहे. उड्डाणपुलाचा काही भाग खोदून उड्डाणपूल आणि बीड बायपास रस्त्यावर बांधल्या जाणाऱ्या नवीन उड्डाणपुलाची सांगड घातली जात आहे.

हे काम अद्यापही सुरू आहे. संग्रामनगर उड्डाणपुलाचा काही भाग खोदून काम करण्यासाठी मनपाने बांधकाम विभागाला परवानगी दिली. उड्डाणपुलाच्या देखरेखीचे शुल्क महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वसूल करणार आहे, असे मनपा प्रशासकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...