आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या बीड बायपासच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत होती. परिणामी, वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यातच महावितरणच्या ३३ केव्ही लाइन व एमआयडीसीच्या ७०० एमएम पिण्याच्या पाइपलाइनचे काम या ठिकाणी सुरू करण्यात आले. त्यामुळे फेब्रुवारीत पोलिसांनी ३ दिवस शहानूरमियाँ दर्गा चौक, संग्रामनगर उड्डाणपूल ते गोदावरी टी-पॉइंटपर्यंतची वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. मात्र, महावितरण व एमआयडीसीचे काम अद्याप प्रलंबित असल्याने त्यांनी पोलिसांकडे दहा दिवस वाढवून देण्याची विनंती केली. त्यामुळे पूर्वीच्या आदेशाप्रमाणे ११ मार्चपासून पुढील दहा दिवस या मार्गाची वाहतूक पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती प्रभारी सहायक आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.