आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरशालेय अॅथलेटिक्स स्‍पर्धा:सानिका, उजेब, निशात, संस्कृतीला सुवर्ण

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एडीसी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित आंतरशालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत माउंट व्हॅली इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत एकूण १३ पदके पटकावली. सुवर्ण विजेत्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुलींच्या १९ वर्षाखालील गटात १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सानिका जगदाळेने सुवर्ण, तर ऋतुजा जगदाळेने रौप्य जिंकले. मुलांमध्ये निशांत चव्हाणने प्रथम क्रमांक, तर उजेब अजहर पटेलने द्वितीय क्रमांक मिळवला. थाळी फेकमध्ये १४ वर्षे गटात कोमल मगरेने प्रथम, तर खुशी कदमने द्वितीय आणि १९ वर्षे गटात संस्कृती जाधवने प्रथम व अंजली मगरने द्वितीय क्रमांक राखला. मुलांमध्ये शेख फराज युसूफ पहिल्या स्थानी व पार्थ जगदाळे दुसऱ्या स्थानी राहिला. गोळाफेकमध्ये उजेब अजहर पटेलने सोने जिंकले. भाला फेकमध्ये गीतांजली बोर्डेने रौप्य मिळवले. विजेत्यांना क्रीडा शिक्षक अवेज खान यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...