आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊत कडाडले:औरंगाबादेत उसळलेली लाट दिल्लीच्या तख्खातालाही हादरा दिल्याशिवाय राहणार नाही, आमचा नाद करू नका

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या मराठवाडा वर्धापनदिनानिमित्त आज मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहिर सभा सुरु आहे. या सभेत संजय राऊत यांनी रोखठोक मत व्यक्त करीत वर्तमान राजकारणावर भाष्य करतानाच भाजपवर टीकास्त्र सोडले.

दिल्लीच्या तख्यताला हादरा देणार

संजय राऊत म्हणाले की, जे सभेला आहेत ते सर्व वाघच आहेत, असे म्हणत राऊतांनी शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ऐवढा मोठ्या जनसमुदयाचा जर भाजपला टोला बसला तर ते उठू शकणार नाही असे म्हणत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरेंची ही ताकद दिल्लीच्या तख्खाताला हादरे देणार असल्याचा त्यांनी म्हटले आहे.

या पुढे शिवसेनेचीच सत्ता राहणार

पुढील काळात शिवसेनेचा भगवाच फडकणार असे म्हणत त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच होणार असे जाहीर पणे स्पष्ट केले आहे. संजय राऊत म्हणाले की, व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर जे आहेत ते सगळेच शिवसेनेचे वाघ आहेत. वाघाचा जो बाप आहे, तोच पाच मिनिटांत व्यासपीठावर येणार आहे. मराठवाड्यामध्ये खूप महिन्यांनी अशी विराट सभा होतेय. 37 वर्षांपूर्वी शिवसेनेची एक शाखा स्थापन झाली. त्या शाखेचा वर्धापन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या उपस्थित साजरा होतोय, यासारखा ऐतिहासिक क्षण साजरा झाला नसले. जेव्हा ही शाखा ही स्थापना झाली, तेव्हा कुणाच्या स्वप्नातही नसेल, उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणून उपस्थित असतील.

त्यांच्या स्वागताला या लाटेचा तडाखा जर भारतीय जनता पक्षाला बसला, तर पाणी मागायलाही उठणार नाहीत. ही उसळलेली लाट पाहून इतके सांगू इच्छितो, ही आंधी आहे, तुफान आहे. और कोई तोड नही इस आंधी का...त्यांच्या स्वागतासाठी उसळलेली ही लाठ दिल्लीच्या तख्खातालाही हादरा दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र, मराठवाडा कोणाचा ही सांगणारी ही सभाय. इथे अनेक लोक आले गेले. मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अद्याप जन्माला यायची आहे. संभाजीनगर...छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि पाठिशी बाळासाहेब ठाकरे आहेत. ज्याने औरंजेबाला मातीत गाडले, निजामाला गाडले. हीच शिवसेना निजामाच्या बापाच्या छातीवर पाय ठेवून सत्तेत आली आहे. आता वर्षानुवर्षे भगवा महाराष्ट्रात फडकत राहील. ही गर्दी, शक्ती इतकेच सांगते, आमचा नाद करू नका. आमच्या वाट्याला जाऊ नका.

काश्मिरी पंडिताचा गुन्हा काय

या मराठवाड्यात म्हणे आक्रोश मोर्चा काढला. आक्रोश मोर्चा कशा करता, रोज हिंदू-हिंदू म्हणताय ना, रोज काश्मिरी पंडितांवर अतिरेक्यांचे भ्याड हल्ले होतायत. सरकार नामर्दासारखे हातावर हात ठेवून बसले आहे. काय या काश्मिरी पंडिताचा गुन्हा काय. मी माननीय मुख्यमंत्र्यांना आव्हान करेन संपूर्ण काश्मीर खोरे आपल्याकडे आशेने पाहते आहे. शिवसेना आम्हाला आधार देईल. उद्धव ठाकरे आधार देतील. जे काम बाळासाहेब ठाकरेंनी केले, तेच काम उद्धव ठाकरे यांना करायचे आहे. प्राण जाय पण वचन ना जाय...हा संभाजी राजेंचा बाणा. उठ-सूठ शिवसेनेवर हल्ले करणे थांबवा. नाही तर तसेच उत्तर मिळेल. देशात असंख्य प्रश्न. महागाई वाढलीय. त्याचे चटके मोदी, शाहांना बसत नाहीत. महागाईवर प्रश्व विचारले तर ज्ञानव्यापीवर बोलतात, बेकारीवर बोलले तर ताजमहलच्या खाली शिवलिंग शोधतात. अरे त्या ऐवजी हिंमत असेल, चीनच्या ताब्यातले कैलास मानस सरोवरातले शिवलिंग आमच्या ताब्यात द्या.

संभाजीनगरचा मुद्दा आला समोर

गेल्या काही दिवसांत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी औरंगाबादेत सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली. यात त्यांनी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला. यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली की, शहरांचे नामांतर संभाजीनगर करावे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार, त्यांच्या बोलण्याचा रोख कुणाकडे असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...