आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत विरोध दर्शवताना त्याच्या मंत्र्यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीना निधी मिळत नसल्याचा आरोप केला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण दिव्य मराठीशी बोलताना म्हणाले की मराठवाड्यात सर्वाधिक निधी संजय शिरसाट यांना मिळाला आहे. त्यांना निधी मिळाला म्हणूनच ते शिंदे याच्यासोबत गेल्याचे चव्हाण यांनी सांगितले
राज्यात शिवसेनेचे 34 आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्यामुळे सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिंदे यांच्या सोबत गेलेल्या शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धती वर आक्षेप नोंदवले आहेत.त्यामुळे शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवा राला बळ दिले जात असल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे. यावर चव्हाण म्हणाले की भाजप राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहे. त्यांनी म्हणणे सहाजिक आहे. आता सिरसाट यांची स्क्रिप्ट भाजप लिहीत आहे .त्यामुळे असे बोलले जात आसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला
भाजपकडून लढणार की शिवसेनेकडून ?
चव्हाण म्हणाले की संजय शिरसाट यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत चांगले संबंध होते. नगर विकास खाते त्याच्याकडे होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि निधीचा संबंध नाही. आता त्यांनी ते भाजप कडून लढणार आहे की शिवसेनेकडून हे त्यांनी स्पष्ट करावे अशी टीका चव्हाण यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच शिवसेनेचे आमदार शिंदे याच्यासोबत गेल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. शिवसेनेकडून याचा विरोध देखील होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.