आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय शिरसाटांचा ठाकरेंवर हल्लाबोल:उद्या बलात्कार आणि खून करणाऱ्यांच्या कबरी बांधतील, याचमुळे आम्ही बाहेर पडलो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्या बलात्कार आणि खुन करणाऱ्यांच्या कबरी बांधल्या जातील. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. मागच्या सरकारचा जो चांगुलपणा होता. त्याचा आम्हाला त्रास होत होता. याच कारणामुळे आम्ही या सरकारमधून बाहेर पडलो. असा हल्लाबोल आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.

याकूब मेमन प्रकरणावरुन संजय शिरसाट यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले, नाहक अनेकांचे बळी घेतले त्याची कबर होणे हे महाराष्ट्रासाठी दुखद आहे. कालच याबाबत बातमी पाहिली. यामध्ये याकूब मेमनची कबर अक्षरशः संगमरवरीच्या दगडाने बांधली जात आहे. लोकांसमोर काय आदर्श ठेवणार आहोत आपण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कठोरात कठोर चौकशी करा

आमची आणि आमच्या पक्षाची हीच भूमिका आहे की, हे जे काही बांधकाम सुरु आहे ते अत्यंत चुकीचे आहे. आणि ते व्हायला नको. भाजपने घेतलेल्या भूमिकेवर शिरसाट म्हणाले, भाजपने काय भूमिका घेतली यावर मी बोलणार नाही. पण आमची भूमिका निश्चित आहे की, ज्यांनी हे सर्व करण्यासाठी परवानगी दिली. त्यांची कठोर चौकशी करण्यात यावी.

कारवाईला सुरुवातही झाली असेल

मुख्यमंत्री अशा गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यांनी याची दखल सुद्धा घेतली असेल. कारवाईला सुरुवातही झाली असेल. शिंदे यांच्या कानावर एखादी गोष्ट गेली तर त्याचा निकाल लागतोच. पुढे आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रीया देणे योग्य नाही, असे म्हणत पेंग्विन सेना या शेलारांच्या वक्तव्याचे समर्थन करणे शिरसाटांनी टाळले.

प्रकरणाची चौकशी करा-सावंत

उद्धव ठाकरेंचा याकूब मेमनशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. अशा तिखट शब्दांमध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, देशामध्ये एवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. मात्र सातत्याने या प्रश्नांवरुन सामान्य जनतेचे लक्ष भटकवण्याचा असा अश्लाघ्य प्रयत्न होतो आहे. याकूबचे उदात्तीकरण शिवसेना करत असल्याचा आरोप तुम्ही करत आहात तर आम्ही मागणी करतो या प्रकरणाची चौकशी करा. उगाच शेपटं आपटवत बसू नका.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकुब मेमन याला फाशी देण्यात आली होती. याच याकुब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आला होता. याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याचे समोर आले. यावरून भाजपा आक्रमक झाली असून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. तर दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी लगेच हालचाल करत या कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या.

बातम्या आणखी आहेत...