आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे यांचे भाषण सुरु असताना अजित पवार, अशोक चव्हाण आपापसात गप्पा मारत होते. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा फ्लॉप शो ठरल्याची टीका शिवसेना प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर केली आहे. महाविकास आघाडीची सभा झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत सभेवर घणाघात साधला.
संजय शिरसाट म्हणाले, मी स्वतः उद्धव ठाकरेंची लाईव्ह सभा ऐकली त्यांच्या भाषणात मला कुठेही बेस दिसला नाही. कधी बारसू, कधी पालघर, कधी चीन, कधी सत्यपाल, कधी चीन नक्की ते कशावर बोलले कळले नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा फ्लॉप शो होता. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्यानंतरचा तणाव दिसत होता.
वज्रमुठ सभा होणार नाही
संजय शिरसाट म्हणाले, यानंतर कदाचित पुन्हा वज्रमुठ सभा होणार नाही, हे मविआच्या नेत्यांनी मनोमन तारले असावे. कदाचित ही आपली शेवटची भेट असेल, असेही नेत्यांना वाटले असेल कारण सभा सुरु असताना अजित पवार, अशोक चव्हाण हे आपसांत गप्पा मारत होते. झाले बाबा एकादाचे आमचे भाषण अशा अविर्भावात ते बोलताना दिसले. महाराष्ट्राचे, शेतकऱ्याचे कुठलेही प्रश्न यात मांडले नाही.
सभा महाराष्ट्रासाठी की मुंबई महापालिकेसाठी?
या सभेतून विशेष अर्थ काढण्याची गरज नाही. आजच्या सभेतून विशेष अर्थ काढण्याची गरज नाही. मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता याची जाणीव झालेली आहे की, शिवसेना-भाजपचे सरकार काम करत आहे. त्यांना टोचणे किंवा बाप चोरला, गद्दार बोलणे आता जमणार नाही. यानंतर महाविकास आघाडीची सभा होणार नाही. मविआची सभा ही महाराष्ट्रासाठी होती की, मुंबई महापालिकेसाठी होती?
संंबंधित वृत्त
भ्रष्टाचाराची जंत्री:ही दुर्बलांची भयभीत सभा, अमित शहांच्या भीतीने 3 पक्ष एकत्र आले; आशिष शेलारांची वज्रमूठ सभेवर टीका
महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा महाराष्ट्र दिनी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सवर पार पडलेल्या या सभेत उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले तिघांनीही राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाविकास आघाडीच्या या सभेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी 'ही दुर्बळांची भयभीत सभा' असे म्हणत घणाघात केला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.