आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:उद्धव ठाकरे कलियुगातील धृतराष्ट्र, तर संजय राऊत शकुनी मामा; संजय शिरसाट यांचा पलटवार

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे कलियुगातील धृतराष्ट्र आहेत, तर संजय राऊत शकुनी मामा असे प्रत्युत्तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला दिले आहे.आमच्या अयोध्या दौऱ्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे संजय राऊत यांना पोटशूळ उठला आहे, असा टोलाही संजय शिरसाट यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आमच्या अयोध्या दौऱ्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे खासदार संजय राऊत यांना पोटशूळ उठला आहे, म्हणून ते आम्हाला रावण रामाला भेटायला गेल्याचे म्हणाले, असा हल्लाबोल करतानाच संजय राऊत हे शरद पवारांना राम आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्मण करतील असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

आमदार संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, संजय राऊत हे तिनपाट माणूस आहे, त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही. लोक मारतील म्हणून त्यांना सुरक्षेची गरज आहे. आमच्यात एकी आहे,एखादा दुसरा आमदार आला नसेल तर असे होत नाही की आमच्यात ऐकी नाही. संजय राऊत टीका करतात कारण त्यांना आता दुसरे काम उरले नाही.

अंबादास दानवेंना प्रत्युत्तर

संजय शिरसाट यांनी अंबादास दानवेंनी केलेल्या टीकेवर बोलताना म्हटले आहे की, अंबादास दानवेंना दुसरे काही काम नाही, लोकांचे पाहावे वाकून इतकेच उद्योग त्यांना आहेत. जर कुणी गु्न्हेगार असेल तर कायदा काम करेल, तुम्ही ताण घेऊ नका, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

वकील गिरीशी काही संबंध नाही

वकील आशिष गिरी यांनी शिवसेना भवन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात देण्यासाठी याचिका दाखल केली आहे. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेना भवन मंदिर आहे, आम्हाला त्यांनी घडवलं आहे. आम्हाला भवन आणि संपत्ती नको, कुणी याचिका दाखल केली असेन तर याचिका आणि आमचा संबंध नाही. आम्ही हे पाप करणार नाही.