आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीच्या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार असतील असा इशारा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिलाय. तसेच नुकतीच दंगल झालेली असताना सभा घेणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या होणाऱ्या सभेवरून राजकारण तापले असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील यावर प्रतिक्रीया दिली आहे.
काय म्हणाले शिरसाट?
सभेविषयी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, उद्याची सभा म्हणजे राजकारणासाठी तुम्ही कोणत्या स्थराला गेलात याचा हा नमुना आहे. सभा कितीही मोठी झाली तरीही मला बाळासाहेबांच्या त्या सभा आठवतात. तिथे कोणी सभा घेण्याची ताकद दाखवली नाही. पण तिथे महाविकास आघाडी सांगतय की, आमची सभा मोठी होणार आहे. जे मैदान शिवसेना प्रमुखाच्या नावे होतं, आज शिवसेनाप्रमुखापेक्षा मोठी सभा घेणार आहोत असे ठाकरे गटाचे शिवसैनिक सांगतात. त्यामुळे हिंदू मतदार जो शिवसेनाप्रमुखांना मानतो तो तिथे जाणार नाही.
सभा घेणं बरोबर नाही
संजय शिरसाट पुढे म्हणाले, शहरात दोन दंगली झाल्यात आजही तणावाचं वातावरण आहे. पोलिसांच्या गाड्या जाळल्यात, पेट्रोल बॉम्ब टाकून ह्या गाड्या पेटवण्यात आल्या आहेत. असे वातावरण असताना सभा घेणे बरोबर नाही. पण विरोध केला तर हे लोकशाहीचा गळा घोटला असं म्हणतात. या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार, असतील असेही शिरसाट म्हणाले.
बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी
ज्या मैदानात महाविकास आघाडीची सभा हेात आहे. त्याच मैदानात शिवसेनाप्रमुखांना मी जवळून पाहिलं होतं. कारण त्यावेळी त्या सभेचे सुत्रसंचालन मी केलं होतं. कुठेही जाहिरात, बॅनर नसताना लाखोंचा समुदाय या मैदानावर एकत्र आला होता. आता त्याच ठिकाणी महाविकास आघाडीची सभा होत आहे. जेथून शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा यज्ञकुंड पेटवला होता. शिवसेनाप्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करण्याचं काम या सभेच्या स्टेजवर होणार आहे.
दोघांच्या मध्ये उद्धव ठाकरे
शिरसाट म्हणाले, शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे काँग्रेस समाजामध्ये दूरी माजवतं. त्यांना गाडलं पाहिजे. पण उद्याच्या सभेत एकीकडे काँग्रेस बसलाय, दुसरीकडे राष्ट्रवादी तर मध्ये उद्धव ठाकरे बसणार असल्याचे चित्र म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी आहे. याच्या यातना आम्हाला हेातात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.