आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''मी सोळा आमदारांत आहे. माझ्यावर कुठे ताणतणाव दिसतोय? जे होईल ते होईल. निकाल घटनेच्या चौकटीतील आहे. तो आमच्या बाजूने लागला तर कायदेशीर आणि इतरांच्या बाजूने लागला तर तो बेकायदेशीर असे म्हणणारे महाभाग आपल्याकडे आहे असा टोला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला लगावला. ते आज माध्यमांशी बोलत होते.
राज्याच्या सत्तासंघर्षाचा उद्या सुप्रीम कोर्टात निकाल लागण्याची शक्यता आहे. यावर नेत्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.
कायदेशीरबाबी तपासूनच उठाव
संजय शिरसाट म्हणाले, ज्यांनी त्यांनी आपपाल्या पद्धतीने निकाल लागण्यापूर्वीच आपले मत मांडण्याची सुरुवात केली. उद्या जो निकाल येईल त्यात सोळा आमदारांवर अपात्रतेचा निर्णय येणार त्यात मी सुद्धा आहे. आम्ही जो उठाव केला त्यावेळी आम्ही सर्व कायदेशीर बाबींचा विचार करुन झालेला हा उठाव होता. आज उठलो आणि उद्या उठाव केला असे झाले नाही.
कुणाच्या दबावात निकाल नाही
संजय शिरसाट म्हणाले, कायदेशीर बाबी आम्ही तपासल्या होत्या. निवडणूक आयोगाकडे आमचा प्रस्ताव प्रलंबित होता. निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निकाल दिला. उद्याच्या निकालाची सर्वांनाच तसा मलाही प्रतिक्षा आहे. उद्याचा निकाल निश्चितच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार, कायद्यानुसार लागणार आहे. तो कुणाच्या दवाबात लागणार नाही.
आपल्याकडे काही महाभाग आहेत
संजय शिरसाट म्हणाले, उद्यापर्यंत वाट पाहावे. ते उद्या काय निकाल देतील यावर आता भाष्य आताच करणे योग्य होणार नाही. मी सोळा आमदारांत आहे. माझ्यावर कुठे ताणतणाव दिसतोय? जे होईल ते होईल. निकाल घटनेच्या चौकटीतील आहे. तो आमच्या बाजूने लागला तर कायदेशीर आणि इतरांच्या बाजूने लागला तर तो बेकायदेशीर असे म्हणणारे महाभाग आपल्याकडे आहे.
सत्ता राहणार की नाही, सांगता येणार नाही
संजय शिरसाट म्हणाले, काही लोकांची सवय आहे. आमचे विरोधक निवडणूक आयोगाकडे गेले होते. त्यांच्याविरोधात निकाल आयोगाने दिला होता. आमच्या कोणत्याही याचिका नव्हत्या. याचिका त्यांच्या होत्या. त्यांच्याकडे घटनातज्ज्ञ लोक आहेत त्यांना काय विचार करायचा तर करू द्या. सुप्रीम कोर्ट निकाल देणार, सत्ता राहणार की, नाही हे मी नाही सांगू शकणार मला याची कल्पना नाही.
अजित पवारांनी CM पदाचे स्वप्न पाहू नये
संजय शिरसाट म्हणाले, तर्क अनेकजण लावतात. त्याला अर्थ नाही, उद्या सर्व खुलासे होतील. शरद पवारांनी बॅनरबाजीवर बॅन केले आहे. भाकरी न फिरवता शरद पवारांनी तीउलटवली आहे. त्यामुळे अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणे बंद केले तरच त्यांचे त्यात हीत आहे.
कुणीच धास्तावले नाही
संजय शिरसाट म्हणाले, निकालासाठी कुणी काम बंद करणार नाही. आमदार त्यांचे कामे जे ते योग्य करतील कार्यक्रम आणि कामे ठप्प होणार नाही. सर्वांनाच निकालाची उत्सुकता आहे. कुणालाही भीती वाटत नसून धास्तावलेही नाही.
या बातम्या वाचा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.