आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वज्रमूठ नव्हे ही बोगसमूठ:उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे ठेवणीतले टोमणे, महाविकास आघाडीच्या सभेवरुन संजय शिरसाट यांचा टोला

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे ठेवणीतले टोमणे होते. काय तर वज्रमूठ म्हणे वज्रमूठ नव्हे ही तर बोगसमूठ होती, असा खोचक टोला शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

संजय शिरसाट म्हणाले, ठेवणीतले टोमणे आणि तेच भाषण सर्वठिकाणी करायचे असेल तर कॅसेट लावायला हवी. अडिच वर्ष हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यासाठी काय केले? मी हे केले ते सांगायला काही असले तर पाहिजे. इस्त्रायलमध्ये काय झाले हे सांगण्यापेक्षा आपल्याकडे काय केले ते सांगा. खोटे बोलण्याची एक मर्यादा असते. ती मर्यादा उद्धव ठाकरे यांनी सोडली आहे.

लोकांना धरुन आणून बसवले

संजय शिरसाट म्हणाले, वज्रमूठ सभा असे नाव त्यांनी या सभेला दिले होते. मात्र ही वज्रमूठ नाही तर बोगसमूठ आहे. उगीच लोकांना धरुन आणून याठिकाणी बसवले होते. सभेत दोन वाक्य फेकल्यानंतर टाळ्या मिळतात. ते 2 वाक्य फेकायचे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या बापाबद्दल जे बोलल्या ते हे विसरले. ते वक्तव्य घाण नव्हते असे यांनी कबूल केले. माझे सुषमा यांच्याबाबत वक्तव्य टोचत असेल तर तिचा सत्कार निश्चित सेना भवन येथे करा.

लोक जोडे मारतील

संजय शिरसाट म्हणाले, शिवसेना प्रमुख फक्त तुमचे वडील नव्हते. त्यांना का छोटे करत आहात. त्यांना कुटुंबापर्यंत मर्यादित ठेवू नका. ते महाराष्ट्राचे नाही तर देशाचे होते. आमचा दिनक्रम आजही साहेबांच्या नावाने होतो. आम्ही काही चोरले नाही. तुम्ही बाळासाहेबांच्या नावाचा व्यापार कराल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला डुबवणार. लोक तुम्हाला लोके जोडे मारतील.

महाविकास आघाडीची सभा

तुम्ही स्वत:ला देशातला सर्वात मोठा नेता मानता, हिंदूंचे नेते देशांचे पंतप्रधान झाले आहेत, असे असूनही हिंदूंना जनआक्रोश मोर्चा काढावा लागतो. मग हा नेता काय कामाचा? अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. रविवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले.