आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा1 लाख काय 5 लाख देतो भाजप नेत्यांवरील भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई झाल्याचे दाखवा, असे वक्तव्य आज संजय राऊतांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
संजय राऊत म्हणाले, दौंड येथील भीमा पाटस साखर कारखान्याच्या गैरव्यवहारात एकूण 500 कोटींचा घोटाळा, आयएनएस विक्रांत घोटाळा हे सगळे घोटाळे ईडी, सीबीआयकडे पाठवले आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील याबाबत कळवले आहे. याठिकाणी काय कारवाई झाली. ते सांगा. कारवाई झाली असेल तर 1 लाख काय 5 लाख देतो, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले.
काय म्हणाले संजय शिरसाट?
संजय राऊतांच्या वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत 5 लाख देताय ऐकून आश्चर्य वाटतय. राऊत द्यायची काय भाषा करता तुम्हाला घ्यायचे कळते.
देण्याची दानत असावी लागते
संजय शिरसाट म्हणाले, राम मंदीराच्या निर्माणासाठी एकनाथ शिंदेंनी 10 लाख दिले होते ते आधी परत करा. 10 लाख उधारीचे आधी परत करा. तिकिटासाठी लोकांकडून पैसे घेता येतात, पत्राचाळ घोटाळ्यातून पैसे कमावता येतात. माणसाला देण्याची दानत असावी लागते जी एकनाथ शिंदेंमध्ये आहे.
पक्षांतर हा राहुल नार्वेकरांचा छंद
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, राहुल नार्वेकर हे लंडनमधून सध्या मुलाखती देत आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचीही चौकशी करण्याची भाषा ते करत आहेत. राहुल नार्वेकर यांचा पक्षांतराचा इतिहास मोठा आहे. पक्षांतर हा राहुल नार्वेकर यांचा छंद आहे. पक्षांतराला उत्तेजन देणे हा त्यांचा व्यवसाय आहे. आम्ही त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत नाही. त्यांनी फक्त सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. अन्यथा महाराष्ट्र काय आहे, हे आम्हाला दाखवावे लागेल.
हेही वाचा
दारूण पराभव:कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या 3 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, दोघांना 200च्या आत मते
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. 136 जागांसह काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. मात्र, या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवारांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र, या निवडणुकीत या तिन्ही उमेदवारांचा केवळ पराभव झाला असे नाही तर त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.