आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत बंडाळीची जी चिन्हे दिसत होती, त्याला शमवण्यासाठी केलेले हे एक प्रकारचे नाटकच आहे, असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. शरद पवार यांनी त्यांचा राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर संजय शिरसाटांनी या संपूर्ण प्रकाराला राष्ट्रवादी नाट्य संबोधले आहे.
नेते, कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय शुक्रवारी सायंकाळी मागे घेतला. 2 मे रोजी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी निवृत्तीची घोषणा करून नवीन नेतृत्व निवडीसाठी समिती जाहीर केली. पण याच समितीने त्यांचा सकाळी राजीनामा फेटाळण्याचा ठराव मंजूर केला व त्यांचा आदर राखत पवारांनीही निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.
माझा बडगा तुम्हाला दाखवीन
या एकूणच प्रकारावर राजकीय स्तकातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार संजय शिरसाट याबाबत म्हणाले, शरद पवारांनी पक्षांतर्गत लोक आणि जे कुणी विरोध करत आहेत, त्यांचा या राजीनामा नाट्यात करेक्ट कार्यक्रम केला. आता पुन्हा अशी हिंमत कराल तर मी माझा बडगा तुम्हाला दाखवीन, असा इशाराच शरद पवार यांनी या राजीनामा नाट्यातून दिला आहे.
योग्य वेळी टाकलेली गुगली
संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले, या संपूर्ण घटनेतून शरद पवार यांनी आपल्या ताकदीची परीक्षा घेतली. शरद पवार हे मोठे राजकारणी आहेत. त्यांनी योग्य वेळी टाकलेली ही गुगली होती. 2 तारखेचा एपिसोड नीट पहिला तर, जेव्हा शरद पवार यांनी राजीनामा दिला, तेव्हा याबाबतचा कोणताही तणाव सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्यावेळी मनात शंका नक्कीच झाली की काहीतरी घडत आहे.
संबंधित वृत्त
नेतृत्वावर शिक्कामोर्तब:शरद पवारांनी राजीनामा नाट्यातून साधल्या या 5 बाबी, राष्ट्रवादीतील संभाव्य बंडखोरीला लगाम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे याचा उलगडा यथावकाश होईलच. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या मते, पवार यांच्या मनात नेमके काय आहे, हे सांगणे तसे कठीणच. तरीही गेल्या काही दिवसांतील हालचाली आणि त्यातून पवार यांची व्यक्त झालेली अस्वस्थता यातून त्यांनी खालील पाच कारणे त्यामागे असू शकतात.... वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.