आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकारणात काहीही घडू शकते. मात्र उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाच्या दृष्टीने उत्तम चेहरा आहे. असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांची उमेदवारी ठरवणारे संजय राऊत कोण? असा सवाल उपस्थित करत, राऊत यांच्या डोक्यावर झालेल्या परिणामामुळे ते असे बोलत असावेत, असा टोला लगावला आहे.
संजय शिरसाट म्हणाले, रोज नवे वक्तव्य करणे हा राऊत यांचा छंद आहे. उद्धव ठाकरे यांची उमेदवारी ठरवणारे संजय राऊत कोण? ते स्वतः उद्धव ठाकरे ठरवतील. किंवा महाविकास आघाडीतले नेते ठरवतील. संजय राऊतला सर्वांनी मिळून परवानगी दिली असेल तर माहित नाही. संजय राऊत सामनातला कारकून आहेत. त्याच्या डोक्यावर झालेल्या परिणामामुळे तो नको ती बडबड करतो, असे वाटते.
काय म्हणाले संजय राऊत?
राजकारणात काहीही घडू शकते. उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहे. महाविकास आघाडी असताना सर्वांनी ठरवले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतील तर एकत्र येऊ आणि सरकार बनवू. त्यानंतर सरकार बनले. देशाच्या राजकारणात खऱ्या शिवसेनेने भूमिका बजावली आहे. संसदेमध्ये आमची खासदारांच्या संख्येला महत्व आहे. अनेक वेळा शिवसेनेने हाती घेतलेले विषय राष्ट्रीय राजकारणात चर्चिले जातात. आमचे नेतृत्व कमी नाही. शिवसेनेचे नेते एकाकी लढतात.
पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण?
उद्धव ठाकरे यांनी काल खेड येथे सभा घेतली. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे. ठाकरेंच्या या आवाहनानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.