आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंविरोधात लोकसभा लढवणार संजय वाघचौरे:काँग्रेसच्या जालना मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा, निवडणुकीची तयारी सुरू

पैठण / रमेश शेळकेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२००९ पासून जालना लोकसभेला जोडला गेलेल्या पैठण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी आता जालन्यातून लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तशा सूचना केल्यानेच आपण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या विरोधात मैदानात उतरत असल्याचे वाघचौरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

आघाडीत जालना लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. पण गेली पाच निवडणुका तिथे भाजपच विजयी होते. या मतदारसंघात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे बळ अधिक आहे. त्यामुळे २०२४ मध्ये हा मतदारसंघ मिळेल, असे नियोजन राष्ट्रवादीने केले आहे. राजेश टोपे यांनी लोकसभा लढणार नसल्याचे स्पष्ट केल्याने संजय वाघचौरे यांना या जागेवर दावा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...