आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथ मुला-मुलींच्या सांभाळासह विवाहाची घेणार जबाबदारी:मोरया फाऊंडेशनचा संकल्प; संस्थेचे उद्घाटन छत्रपती संभाजी राजेंच्या हस्ते होणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना नवउद्योजक बनविण्यासाठी मोरया गणेश फाऊंडेशन काम करणार आहे. याच बरोबर विविध जिल्ह्यातील अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करून त्यांच्या विवाहाचीही जबाबदारी घेणार असल्याचा संकल्प मोरया फाऊंडेशने केला आहे.

पत्रकार परिषदेत दिली माहिती

हे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेचे उद्घाटन माजी खा. छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश मानकुसकर यांनी दिली आहे.

शनिवारी करणार उद्घाटन

विविध सामाजिक उपक्रमांसंदर्भात माहिती देण्यासाठी बुधवारी (दि.2) आयोजित पत्रकार परिषदेत मानकुसकर बोलत होते. यावेळी प्रसिध्द वक्ते प्रदिप सोळुंके, ऋषीकेश मोरे, चंद्रकांत तौर, शुभम जाधव, प्रमोद सोळुंके, राहुल शेळके आदींची उपस्थिती होती. मानकुसकर म्हणाले, शनिवारी (दि.5) सायं 6 वाजता गोल्डन सिटी येथे या छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते मोरया गणेश फाऊंडेशनचे उद्घाटन होणार आहे.

यांची असणार उपस्थिती

यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, शक्ती भक्ती वारकरी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रसिध्द वक्ते प्रदिप सोळुंके आदींची उपस्थिती राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...