आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयोग:विज्ञान प्रदर्शनात संस्कार, संत मीरा विद्यालय प्रथम ; विविध 64 प्रयोग सादर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपातर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित विज्ञान प्रदर्शनात संस्कार प्राथमिक विद्यालय आणि संत मीरा विद्यालय या शाळांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटांत ही स्पर्धा झाली.मनपा सीबीएसई विद्यालय गारखेडा येथे उपायुक्त नंदा गायकवाड व शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद‌्घाटन झाले. तंत्रज्ञान आणि खेळणी तसेच पर्यावरणपूरक साहित्य, आरोग्य आणि स्वच्छता, सॉफ्टवेअर व ॲप, रहदारी पर्यावरण व हवामानातील बदल, गणितीय मॉडेल या विषयावर विद्यार्थ्यांनी ६४ विविध प्रयोग सादर केले. प्राथमिक विभागातून संस्कार विद्यालय जाधववाडी (प्रथम), बाल ज्ञान मंदिर (द्वितीय) तर मनपा नारेगाव शाळा (तृतीय) यांच्या संघाने यश मिळवले.

माध्यमिक विभागात संत मीरा विद्यालय सिडको (प्रथम), गजानन बहुउद्देशीय शाळा गारखेडा (द्वितीय), सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय (तृतीय) या संघाने यश मिळवले. विजेत्यांचे प्रयोग जिल्हापातळीवरील प्रदर्शनासाठी पाठवले जातील. शिक्षकांच्या गटात एस. आर. मुळे (गुजराती विद्या मंदिर) यांनी हसतखेळत विज्ञान व वाय. बी. चित्ते (सभू) यांनी भौमितिक आकृत्यांचे रहस्य या विषयावर साहित्यनिर्मिती करुन प्रथम क्रमांक पटकावला.

बातम्या आणखी आहेत...