आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी औरंगाबादचा बास्केटबॉल संघ जाहीर:मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी संस्कार लोढा, तर मुलींच्या संघातून रिया पटेल करणार नेतृत्व

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महा बास्केटबॉल संघटना व सोलापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सांगोला (सोलापूर) येथे 11 ते 15 सप्टेंबरदरम्यान राज्यस्तरीय अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

संघात 24 मुला-मुलींचा सहभाग

स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलेमुली खेळाडू सहभागी झाले असून. या स्पर्धेत औरंगाबादचे संघ सहभागी होणार आहेत. 24 सदस्यीय मुलामुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी (10 सप्टेंबर) औरंगाबाद जिल्हा आणि तालुका बास्केटबॉल संघटनेतर्फे विभागीय क्रीडा संकुलातील मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गणेश कड, अ‍ॅड. संजय डोंगरे व मनजीतसिंग दरागो यांनी ही माहिती दिली.

पुढील स्पर्धा राजस्थानमध्ये होणार

सांगोला येथील राज्यस्तरीय अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलामुलींच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा पुढील महिन्यात राजस्थान येथे होणार आहे.

प्रत्येक सामन्यानुसार नियोजन करणार

राज्य स्पर्धेत कुठला संघ कोणाला मात देईल सांगता येत नाही. कमजोर संघही कधी कधी भाव खाऊन जातो. त्यामुळे आम्ही प्रत्येक सामन्यानुसार नियोजन करणार आहोत, असे दोन्ही संघाचे कर्णधार संस्कार लोढा व रिया पटेल यांनी सांगितले. ‘संघात चांगला ताळमेळ आहे. संघात नवे व अनुभवी खेळाडू असल्याने दोन्ही संघ मजबूत बनले आहेत. निश्चित अंतिम फेरी गाठणे हे आमचे लक्ष्य असेल. विरोध संघ पाहून आम्ही योजना अखाणार आहोत, असे प्रशिक्षक विश्वास कड यांनी म्हटले.’

औरंगाबादचा बास्केटबॉल संघ पुढील प्रमाणे :

मुले - संस्कार लोढा, नरेंद्र चौधरी, वीर पाटणे, क्षितिज भागवत, अनिमेश म्हस्के, हर्षल जटावाले, वर्धमान निरंजन, युवराज सिंग, ओम निकम, ओम गवळी, पार्थ शेलार व कृष्णा शर्मा. मुख्य प्रशिक्षक रौनक सिंग, प्रशिक्षक अक्षय जयस्वाल.

मुली - रिया पटेल, जुही जाधव, जानवी बराटीए, गौरी पाटील, भूमी कपूर, हर्षिका शर्मा, संजना घुसिंगे, उत्कर्षा शिंदे, असीमा इंगळे, प्रेरणा दिवाण व उन्नती डोंगरे. मुख्य प्रशिक्षक विश्वास कड, प्रशिक्षक अनुज नंदापुरकर.

बातम्या आणखी आहेत...