आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ज्ञानस्रोत केंद्र (केआरसी) अर्थात मध्यवर्ती ग्रंथालयाने देशातील ३५ महान स्त्रियांवरील ई-रिसोर्सेस क्लिकवर उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापकांना विद्यापीठ संकेतस्थळावरून हे साहित्य डाऊनलोड करता येईल. संत मीराबाई यांच्यावर सर्वाधिक १४ पीएचडी प्रबंध आहेत. त्याखालोखाल झुंपा लहिरींवर १२, तर अमृता प्रीतम यांच्यावर ११ प्रबंध ऑनलाइन उपलब्ध आहेत.
‘केआरसी’ने दहा वर्षांपासून ‘डिजिटायझेशन’वर भर दिला आहे. त्याअंतर्गत विविध महापुरुष, राजकीय नेते, प्रभावी महिलांवरील जगातील साहित्य ऑनलाइन स्वरूपात एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. निवडक ग्रंथ, निवडक पीएचडी प्रबंध, व्हिडिओ, डॉक्युमेंटरी, सिनेमा, एमफिल प्रबंध आणि इतर ई-रिसोर्सेसचे संकलन करण्यात ‘केआरसी’ला यश आले आहे. देशातील प्रभावी ठरलेल्या ३५ महिलांचे ई-रिसोर्सेस एकत्रित करून आता क्लिकवर उपलब्ध आहे. ३५ महिलांवर ७२३ ई-रिसोर्सेस संकलित करण्यात आले आहेत. त्यात ७६ निवडक ग्रंथ आहेत. ११२ पीएचडी प्रबंध ऑनलाइन आहेत. व्हिडिओ, सिनेमा, डॉक्युमेंट्रींची संख्या २७२ आहे. शोधनिबंधांसह इतर साहित्यांत २५७ रिसोर्स उपलब्ध आहे.
एमफिलच्या प्रबंधांची संख्या ६ आहे. या आकडेवरीवरून असे निदर्शनास आले की, सर्वाधिक ऑनलाइन पीएचडी प्रबंध संत मीराबाई यांच्यावर आहेत. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर ८ पीएचडी प्रबंध आहेत. सरोजिनी नायडू यांच्यावर ४, तर राजमाता जिजाऊंवर १, सावित्रीबाई फुले ४, अमृता प्रीतम यांच्यावर ११ पीएचडी प्रबंध आहेत. झुंपा लहिरी म्हणजेच निरंजना सुदेशना लहिरी यांच्यावर १२ पीएचडी प्रबंध आहेत. महाश्वेतादेवी ७, गौरी देशपांडे ४, कवयित्री इंदिरा संत यांच्यावर ३ पीएचडी आहेत.
अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाईंवर प्रत्येकी सात पीएचडी संत मुक्ताबाईंवर ४, संत जनाबाई ६, अहिल्याबाई होळकर ७, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ७, राणी दुर्गावती २, मदर तेरेसा १, सुभद्राकुमारी चौहान २, बहिणीबाई चौधरी १, शांता शेळके २, डॉ. सरोजिनी बाबर, दुर्गा भागवत १, लेखिका मेघना पेठे-२, लीला मुजुमदार २, मृणाल पांडेंवर ६ शोधप्रबंध उपलब्ध आहे. एमफिलचे प्रबंध गौरी देशपांडे (२), दुर्गा भागवत, मेघना, संत मीराबाई आणि कवयित्री बहिणाबाई यांच्यावर प्रत्येकी एक प्रबंध आहे.
ऑनलाइन प्रबंध उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना फायदा ऑनलाइन साहित्य, पीएचडी प्रबंध, सिनेमा, शोधनिबंध एकत्र उपलब्ध करून देण्याची आम्ही प्रक्रिया पूर्वीच सुरू केली आहे. २७२ व्हिडिओ, सिनेमा, डॉक्युमेंट्रींपैकी सर्वाधिक ४४ लता मंगेशकर यांच्यावर आहेत. एस. एस. सुब्बलक्ष्मी २३, सिंधुताई सपकाळ २२, संत मीराबाई १५, जनाबाई ११, कलावती आई १३ अशा पद्धतीने एकत्र केले आहेत. संशोधकांना याचा नक्कीच फायदा होईल. - डॉ. धर्मराज वीर, संचालक, केआरसी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.