आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्तरंग सोहळ्यातील एक क्षण:ओंकारमध्ये श्रीरामावर आधारित सप्तरंग सोहळा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओंकार विद्यालयाचा श्रीरामावर आधारित सप्तरंग सोहळा संत एकनाथ नाट्यगृहात नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी केले. या वेळी पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संगीत, नृत्यनाट्य असा अनोखा संगम या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळाला. हिंदीतून सादर झालेल्या नाटकाचे दिग्दर्शन किशोर जांगडे, नृत्य दिग्दर्शन उमेश चाबुकस्वार, संगीतिका लेखन दिग्दर्शन मंगला कुलकर्णी, तबला साथ राम लिंगाडे यांनी दिली. याप्रसंगी संस्था अध्यक्ष डॉ. संजीव सावजी, सचिव हरीश जाखेटे, मुख्याध्यापिका सुजाता भाले, उपमुख्याध्यापक नागेश जोशी, विनोद पाटील, डॉ. मधुश्री सावजी, अर्चना नरसापूर, श्रीकांत दरक, प्रचिती अभ्यंकर आदींची उपस्थिती होती. दीपाली भाले यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...