आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूक मोर्चात मागणी:मराठा विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ आता उभारणार स्वतंत्र वसतिगृह; 2 वर्षांपूर्वी वसतिगृहाचा निर्णय, अद्यापही सुरू नाही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य शासनाची सारथी ही संस्था वसतिगृह उभारणार आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांत स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, दोन वर्षे उलटून गेली तरीही औरंगाबाद शहरात वसतिगृह सुरू झाले नाही. जागा आणि दर परवडत नसल्याने एकही संस्था पुढे न आल्याने हे वसतिगृह सुरू झाले नाही. मात्र, आता महाविकास आघाडी सरकारने ‘सारथी’ अंतर्गत वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.

पाच वर्षांपूर्वी मराठा समाजाने काढलेल्या मूक मोर्चात प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारावेत, ही एक महत्त्वाची मागणी होती. तत्कालीन फडणवीस सरकारने वसतिगृह उभारण्याची घोषणा केली. सरकारी इमारत उपलब्ध असेल तर तेथे किंवा नवी इमारत उभारून वसतिगृह सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी छावणीतील निझाम बंगला परिसरातील एका इमारतीत वसतिगृह सुरू करण्याची तयारी केली हाेती. हे वसतिगृह चालवण्यासाठी ७ संस्था पुढे आल्या.

त्यातील राष्ट्रमाता जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टला हे वसतिगृह चालवण्यासाठी देण्याचा निर्णयही झाला. मात्र, नंतर शासनाने ठरवून दिलेले दर परवडत नसल्याचे सांगून या संस्थेनेही माघार घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने जागा शोधून नवी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान, कोरोनाची साथ आली अन् या मुद्द्याचा प्रशासनालाही विसर पडला.

वसतिगृहासाठी एक वर्ष कालावधी लागेल
राज्य शासनाची सारथी ही संस्था वसतिगृह उभारणार आहे. मात्र, अद्याप सारथी संस्थेलाच जागा मिळालेली नाही. त्यामुळे आधी सारथीच्या कार्यालयाला जागा आणि नंतर वसतिगृह तयार होईल. त्यामुळे वसतिगृह सुरू होण्यास किमान एक वर्ष लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

अन्य वसतिगृहांत जागा राखीव ठेवा
मराठा विद्यार्थ्यांसाठी तत्काळ वसतिगृह उभारावे. वसतिगृह सुरू होत नाही, तोपर्यंत सरकारच्या अन्य वसतिगृहांत मराठा विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवून त्यांना प्रवेश द्यावा. शासनाकडून वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या सुविधा, सवलती मिळतात, त्या मराठा विद्यार्थ्यांनाही द्याव्यात. -विनोद पाटील, मराठा आरक्षण हस्तक्षेप याचिकाकर्ते

वक्रदृष्टी दाखवली
फडणवीस सरकारने मराठा विद्यार्थ्यांसाठी ज्या कल्याणकारी योजना आखल्या होत्या, त्या नजरेआड करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. या सरकारने मराठा समाजावर सुरुवातीपासून वक्रदृष्टी दाखवली. आमच्या आंदोलनात वसतिगृहाचा मुद्दा आहे. -विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम

बातम्या आणखी आहेत...