आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शिंदे'सेनेचा हल्ला:उद्धव युवा सेनेत रविवारनंतर किमान 18 जागांवर भरती, पडझड रोखण्यासाठी सरदेसाईंचा औरंगाबाद दौरा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरेंच्या सेनेची बरोबरी करण्यासाठी शिंदे सेनेतही युवा सेनेची बांधणी सुरु झाली आहे. ज्या प्रमाणे आदित्य ठाकरे युवा सेनेचे प्रमुख आहेत. त्या प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत ठाकरे शिंदे सेनेच्या युवा सेनेचे प्रमुख होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान औरंगाबादेतील १८ युवा सेनेचे पदाधिकारी शिवसेनेत गेले आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. ते परतावून लावत संघटना बांधणीसाठी आदित्य यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई ११ ऑगस्टनंतर औरंगाबादेत येत आहेत. त्यानंतर किमान १८ जागांवर नवी भरती करण्याची तयारी सुरू झाली आहे.

माजी महापौर आणि युवा सेनेचे सचिव असलेले राजेंद्र जंजाळ यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर त्या पाठोपाठ तीन शहर प्रमुख आणि एका उपजिल्हा प्रमुखांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यामुळे युवा सेनेने त्या जागेवर नवीन पदाधिकारी देण्याची तयारी सुरु केली आहे. तर शिंदे सिनेतील युवा सेनेत जिल्हाप्रमुख नेमके कोणाला करायचे हा तिढा अजून सुटलेला नाही. त्यामुळे पुढची कार्यकारणी तयार झाली नसल्याची चर्चा आहे. राज्य पातळीवर युवा सेनेची जवाबदारी राज्याचे सचिव म्हणून जवाबदारी असलेल्या आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक आणि किरण साळी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला असून त्यांना शिंदे सेनेतील युवा सेनेत सचिव पद मिळणार असल्याची चर्चा आहे. शहरात युवा सेनेचे ८४ पदे आहेत त्यातील १८ जणांनी युवा सेनेत प्रवेश केला आहे.

एका जागेसाठी दहा जण इच्छुक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरदेसाई दोन दिवस औरंगाबादेत असतील. आतापर्यंत युवा सेना विस्तारक म्हणून काम पहाणारे निखील वाळेकर शिंदे सेनेत गेले आहेत. अर्जुन खोतकर यांचा मुलगा अभिमन्यु विभागीय सचिव पद सोडून शिंदेसेनेत गेला. त्यामुळे घडी पुन्हा बसवण्यासाठी सरदेसाईंचा दौरा आहे. युवा सेना सोडून शिंदे सेनेत गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागा कधी भरल्या जातील या बाबत युवा सेनेचे जिल्हाधिकारी हनुमान शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, एका पदासाठी किमान दहाजण इच्छुक आहेत. पक्षनिष्ठा आणि कामाची शैली बघून ही पदे देण्यात येतील.

बातम्या आणखी आहेत...