आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच:तर सरपंचांना बडतर्फ करणार : सीईओ गटणे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी धोका पूर्णपणे टळला नाही. लसीकरणाला गांभीर्याने घेतले जात नाही. आतापर्यंत दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ ६२ टक्क्यांवरच आहे. जी गावे यामध्ये मागे आहेत. तेथील सरपंचांवर तत्काळ बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिला आहे. सोमवारी ते पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या महिनाभरापासून लसीकरण ठप्प झाले आहे. जानेवारी महिन्यात २ लाख ४३ हजार, फेब्रुवारी महिन्यात २ लाख १० हजार, एप्रिलमध्ये १ लाख ४४ हजार तर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक ७ लाख २२ हजार जणांचे लसीकरण झाले होते. परंतु ग्रामीण भागामध्ये लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तरी ज्या गावांमध्ये सर्वात कमी लसीकरण झालेले आहे. अशा गावातील सरपंचांवर जि.प. अधिनियम १९६२ अंतर्गत ३७(१) नुसार बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, अशा इशारा गटणे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...