आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामांकन:सरवदे, अमृतकर, भारती गोरे यांची परिषदेवर वर्णी ; 38 बीओएसवर 226 प्राध्यापकांचे नामनिर्देशन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नामनिर्देशित सदस्यांसाठी पात्र प्राध्यापकांकडून ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज मागवले आहेत. ३८ अभ्यास मंडळावर २२६ प्राध्यापकांचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले गुणवत्तेनुसार नामांकन करणार आहेत. दरम्यान, व्यवस्थापन परिषदेत तिघांचे कुलगुरूंनी नामनिर्देशन केले. त्यात २ अधिष्ठाता आणि एक विभागप्रमुखांचा समावेश आहे.

विद्याशाखेच्या अधिष्ठातांसमवेत बैठक घेऊन प्रत्येक अभ्यास मंडळावर ६ सदस्य नामनिर्देशित करणार आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ चे कलम ४० (२) (ख) नुसार संबंधित विद्याशाखेच्या अधिष्ठातांशी विचारविनिमय करूनच नामनिर्देशन करणार आहेत. किमान दहा वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असलेल्या ६ अध्यापकांचे प्रत्येकी एका अभ्यास मंडळावर नामांकन केले जाणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान (१३ ), वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र (५) मानव्यविद्या (१३) व आंतर विद्याशाखेतील (६) अशा ३८ अभ्यास मंडळांवर २२६ जणांचा समावेश आहे. एखाद्या व्यक्तीने अर्ज सादर केला नसेल. पण ती व्यक्ती पात्र आहे, अशी कुलगुरूंची धारणा असेल तर त्यांचे नामनिर्देशन केले जाईल, असे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भगवान साखळे यांनी सांगितले.

वायकर, सोनकांबळेंचा कार्यकाळ संपला दोन अधिष्ठाता व्यवस्थापन परिषदेत नामनिर्देशित केले जातात. आधी डॉ. भालचंद्र वायकर आणि डॉ. चेतना सोनकांबळे होत्या. त्यांचा कार्यकाळ संपला आहे. नव्या व्यवस्थापन परिषदेत वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे आणि डॉ. प्रशांत अमृतकर यांची वर्णी लागली आहे. विभागप्रमुखांमधून डॉ. भारती गोरे यांना संधी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...