आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Sarvadharma Mahasamelana Organized For The First Time In Aurangabad Learn To Forgive, True goodness Is Man's Ultimate Goal; Sentiments Expressed By Religious Leaders

औरंगाबादेत पहिल्यांदाच सर्वधर्म महासंमेलनाचे आयोजन:माफ करणे शिका, सत्य हेच मानवाचे अंतिम ध्येय; धर्मगुरुंनी व्यक्त केल्या भावना

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविधतेने नटलेला देश म्हणून भारताची ओळख आहे. इथली वेशभूषा, खानपान, राहणीमान, भाषा इत्यादी वेगवेगळे असले तरीही एकोप्याने राहतात. विविधतेत एकता असलेला भारत हा जगाच्या पाठीवर एकमेव देश आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा एकोपा आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने औरंगाबाद शहरात पहिल्यांदा सर्वधर्म महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. हे संमेलन मंगळवारी ( 16 ऑगस्ट) हिराचंद कासलीवाल प्रांगणात झाले.

यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संतांची उपस्थिती होती. यामधे ज्ञानगंगा महोत्सवात जैन धर्मीय भारतगौरव राष्ट्रसंत आचार्य पुलकसागर, लोकेश मुनि महाराज, शीख धर्मीय परमजीत सिंह चंडोक, हिंदू धर्मीय गोस्वामी सुशील महाराज आणि मुस्लिम धर्मीय जनाब इमाम अमेर अहमद इलीयासी यांची प्रमुख उपस्थिती होती.

25 वर्षात भारत विश्व गुरू

निर्मळ अंतकरणाची पवित्रता हेच सर्व धर्माचे सार आहे. या भारतात सर्वांची जाती वेगळी, धर्म वेगळे एवढेच काय तर पूजा प्रार्थनेची पद्धतीही वेगवेगळी आहे. पण, मानवता हाच संदेश स्थापित करण्याचा सर्वांचा अंतिम उद्देश आहे. भारताच्या याच सौंदर्यामुळे संपूर्ण जगात भारताचे पूजन केले जाते. पुढील 25 वर्षात भारत विश्व गुरू होणार आहे. विचार भावना चांगल्या ठेवा तरच जीवन सफल होईल. असा संदेश यावेळी देण्यात आला.

माफ करणे शिका

सगळ्यांना माफ करणे शिका. कारण, माफ करणे आणि माफी मागणे यासारखे मोठे काम काहीच नाही. सत्य आणि चांगुलपणा हेच मानवाचे अंतिम ध्येय आहे. त्यामुळे सर्वांनी इतर धर्मांचा आदर करा. त्यातच खरी भक्ती आहे. सर्वधर्म विश्व शांतीचा संदेश देतात. त्यामुळे कोणत्याही मार्गाने गेलात तरी सर्व एकाच सागराला मिळणार आहेत. भारताची भूमिका जगासाठी सर्वात महत्त्वाची आहे. सगळे जग आपल्याकडे लक्ष ठेवून आहे. यावेळी सर्व धर्मगुरूंनी अशा भावना मांडल्या. विशेष म्हणजे सर्व धर्मीय महिला पुरुष ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...