आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला टी-20 क्रिकेट:औरंगाबादने सातारा संघाचा धुव्वा उडवला; केवळ 7.3 षटकांत मिळवला विजय

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित 19 वर्षाखालील महिला क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने शानदार कामगिरी करताना केवळ 7 षटकांत विजय मिळवला. औरंगाबादने सातारा महिला संघावर 10 गड्यांनी मात केली. साताऱ्याचा अवघ्या 36 धावांत धुव्वा उडवला. तसेच ही मॅच धुळ्यात घेण्यात आली.

या सामन्यात गोलंदाज भुमिका चव्हाण (4 बळी) सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. औरंगाबादच्या संघाने प्रथम ऐवढा मोठा विजय मिळवला. पाल येथील एचएसजे स्टेडियम झालेल्या विविध स्पर्धेत औरंगाबादच्या महिला खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाल्याने त्याचा फायदा झाला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सातारा संघाचा डाव 11.1 षटकांत सर्वबाद अवघ्या 34 धावांवर संपुष्टात आला. संघाचा फलंदाज मैदानावर टिकण्याच्या मानसिकतेत दिसला नाही. सलामीवीर इराने एकाकी लढत देत सर्वाधिक 20 धावा काढल्या. तिने 18 चेंडूंत 2 चौकार मारले. त्यानंतर आलेल्या सर्व फलंदाजांनी निराशा केली. त्यांना दुहेरी धाव संख्या ही गाठता आली नाही. औरंगाबादच्या धारदार गोलंदाजी पुढे त्यांचे तब्बल 7 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. समृध्दी बनावणेने 3 आणि निशिगंधा नलावडेने 1 धावा काढली.

भुमिकाचे एकही धाव न देता 2 बळी

गोलंदाजीत औरंगाबादच्या भुमिका चव्हाणने टिच्चून मारा करत 2.1 षटकांत एकही धाव न देता 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तिने दोन षटके देखील निर्धाव टाकली. पुजा जमधडेने 2 षटकांत शुन्यांत 2 बळी घेतले. तिने दोन्ही षटके निर्धाव टाकली. अष्टपैलू श्वेता सावंतने 1 षटकात 4 धावा देत एकाला टिपले. यशोदा व सिद्धी महाजनने प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

सलामी जोडी नाबाद

प्रत्युत्तरात औरंगाबादच्या संघाने अवघ्या 7.3 षटकांत 36 धावा करत एकही गडी न गमावता माफक आव्हान सहज गाठले. यात सलामीवीर जिया सिंगने संयमी खेळी करत 22 चेंडूंत नाबाद 8 धावा काढल्या, दुसरी सलामीवीर अष्टपैलू खेळाडू श्वेता सावंतने 23 चेंडूचा सामना करतात 3 चौकार खेचत नाबाद 23 धावांची विजयी खेळी केली. फलंदाजाप्रमाणे साताऱ्याचे गोलंदाज बळी घेण्यात अपयशी ठरले. निशिगंधा नलावडेने 2 षटकांत सर्वाधिक 13 धावा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...