आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालघु उद्योजकांसाठी दिलासादायक इन्कम टॅक्स सीलिंग लिमिटेडमध्ये वाढ आणि टॅक्स स्लॅबमधील बदलामुळे छोट्या उद्योजकांना थेट फायदा होईल. लघु उद्योजकांना विविध रेकॉर्ड सांभाळण्याच्या प्रक्रियेपासून दिलासा मिळेल. - किरण जगताप, अध्यक्ष मसिआ
स्टार्टअप्ससाठी प्रोत्साहनपर उपाय कृषिपूरक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठीच्या अॅग्रिकल्चर अॅक्सिलरेटर फंडाचा प्रस्ताव स्वागतार्ह आहे. करांमधील सवलत व करांचे सुसूत्रीकरण यामुळे मोठा आधार मिळणार आहे. - आशिष गर्दे, संचालक मॅजिक
विकासाला चालना मिळेल पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपये आणि राज्याचा वाटा धरल्यास १३ लाख कोटींची तरतूद केल्याने देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. - राम भोगले, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर
व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष, अन्याय छोट्या व्यापाऱ्यांना सवलतींपासून वंचित ठेवले जाते. व्यापारी सर्वाधिक टॅक्स भरतात व रोजगार देतात. त्यांच्या उतारवयात पेन्शन लागू करायला हवी होती. त्याकडे दुर्लक्ष करून अन्याय केला आहे. - संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ.
व्यापाऱ्यांकरिता काहीच नाही व्यापाऱ्यांसाठी काहीही विशेष सवलत नाही. बऱ्याच वर्षांपासून आम्ही स्वतंत्र व्यापार मंत्रालयाची मागणी करत आहोत. ती मंजूर झाली नाही. रेल्वेसाठी मराठवाड्याला काही मिळावे. - लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ
मध्यम व लघु उद्योजकांना पूरक पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी, ५० नवीन विमानतळ, स्किल इंंडिया इंटरनॅशनल सेंटर्स या तरतुदींमुळे हा अर्थसंकल्प पायाभूत विकास व मध्यम व लघुउद्योगांना प्रगतिपथावर नेणारा आहे. - नितीन गुप्ता, अध्यक्ष, सीएमआयए
कृषीवरील जीएसटी रद्द हवा होता तूरडाळ हब निर्णय स्वागतार्ह, पण आयात थांबवली पाहिजे. अर्थमंत्र्यांनी कृषी अवजारे, साहित्य, बी-बियाणे, खते आदींवर ५ ते २८ टक्के जीएसटी रद्द करायला हवा होता. - जयाजीराव सूर्यवंशी, शेतकरी नेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.