आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराल्लाेड तालुक्यातील नानेगाव, उपळी, जंजाळा ग्रामपंचायतींवर शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार, पैठण तालुक्यातील सातपैकी सहा ग्रा.पं.वर शिंदेसेनेचे आमदार संदिपान भुमरेंचे वर्चस्व दिसून आले. खातगाव ग्रा.पं. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचाैरे यांच्या ताब्यात आली. वैजापूर तालुक्यातील पानवी खंडाळा, लाख खंडाळामध्ये, गंगापूरमधील दोन ग्रा.पं.मध्ये स्थानिक पॅनल विजयी झाले. पैठणमधील प्रतिष्ठेच्या आपेगावसह खेर्डा, तांडा बु., आगर नांदर, नानेगाव, शेवतामध्ये भुमरेंचे वर्चस्व सिद्ध झाले. आगरनांदर, खेर्डा या नव्या ग्रामपंचायतीही भुमरेंच्या ताब्यात आल्या. माजी सभापती, आमदारांचे सुपुत्र विलास भुमरेंच्या हस्ते पंचायत समिती कार्यालयात विजयी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जनता शिंदेसेनेसोबतच असल्याचे भुमरे म्हणाले. या वेळी नगरसेवक भूषण कावसानकर, शेखर शिंदे, नामदेव खरात, जनार्दन मिटकर उपस्थित होेते.
थोडक्यात निकाल असा आपेगाव - सर्व ९ जागा शिंदेसेना. खेर्डा - शिंदे गट ६, अपक्ष ३. तांडा - सर्व ९ शिंदेसेना. आगरनांदर - सर्व ९ शिंदेसेना. खातगाव - राष्ट्रवादी. नानेगाव - शिंदेसेना. शेवता - शिंदेसेना. येसगाव दोन (ता. खुलताबाद) - स्थानिक पॅनल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.