आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपसोबत युती नाहीच:स्थानिक पातळीवर मैत्रीपूर्ण लढती होणार; शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार भूमिकेवर ठाम

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक पातळीवर भाजपसोबत युती करणार नाही, अशी ठाम भूमिका शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतलीय. त्यामुळे येणाऱ्या काळात होणार काय, असा सवाल आत्तापासूनच विचारला जात आहे.

शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदे सेनेने भारतीय जनता पक्षासोबत युती केली. मात्र, स्थानिक पातळीवर युती करायला अनेक आमदार नकार देत आहेत.

काय म्हणाले सत्तार?

कृषिमंत्री अब्दुल सत्तार टीव्ही चॅनलशी बोलताना म्हणाले की, मी त्यांना विनंती केली. दोघांचेही कार्यकर्ते नाराज होऊ नयेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सक्षम रहावेत, संयमी रहावेत आणि त्यांना दुसरा मार्ग मिळू नये. ही दक्षता घेऊनच दोघांनीही मैत्रीपूर्ण लढावे.

राज्य लेवलवकर युती

सत्तार म्हणाले की, रावसाहेब दानवेही काल जालन्यात तेच म्हणाले. निवडून आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी युती करू. युती करणारच. राज्य लेवलवर युती आहे. लोकसभेत राहणार आहे. विधानसभेत राहणार आहे. विधान परिषदेत राहणार आहे. मात्र, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पालिका, नगर पंचायती या छोट्या-छोट्या निवडणुका असतात. त्यामुळे या ठिकाणी युती होऊ नये असे आम्हाला वाटते.

कार्यकर्ते जिवंत राहतील

सोयगाव नगर परिषदेमध्ये 17 नगरसेवक माझे आहेत आणि 2 नगर सेवक त्यांचे आहेत. पुढे जागा वाटप होतील, तर कशा करणार हा प्रश्न आहे. दोन त्यांना देणार आणि सतरा मी घेणार. त्यांचे दोनवर समाधान होईल का, असा सवालही त्यांनी केला. सिल्लोडमध्ये 30 नगरसेवक आहेत. त्यात 2 भाजपचे आहेत आणि 28 माझे आहेत. तिथेही मी अठ्ठवीस तिकीट घेतले आणि दोन त्यांना दिले, तर त्यांच्या कार्यकर्त्यांचे समाधान होणार नाही. त्यामुळे कार्यकर्ते जिवंत राहण्यासाठी मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात, अशी अपेक्षा सत्तार यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...