आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:अल्पसंख्याकांचे नेते असल्यानेच सत्तारांना सुळे प्रकरणात लक्ष्य केले :  गायकवाड

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार सुुप्रिया सुळे यांच्याविषयी वक्तव्याबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली. तरीही राष्ट्रवादीच्या जालन्यातील महिला पदाधिकाऱ्याने सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. सत्तार अल्पसंख्याकांचे नेते आहेत. दलित, बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच त्यांना सुळे प्रकरणात लक्ष्य करण्यात आले, असा आरोप रिपब्लिकन डेमोक्रॅटिकचे संस्थापक अध्यक्ष, माजी जि.प. सदस्य रमेश गायकवाड यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, कुणीही भ्रमाच्या नंदनवनात राहू नये. सत्तारांचे कपडे फाडण्याचा इशारा देणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...