आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभाग आणि विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे आयोजित काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा कार्यक्रम झाला. यात १७१ कवींनी सहभाग घेतला होता. त्यातील काही निवडक कवितांचा विद्यापीठाच्या वतीने काव्यसंग्रह प्रकाशित केला जाणार आहे.
स्पर्धेत चांदूर (बुलडाणा) येथील सौरभ हिवराळे हा महाविजेता ठरला. त्याच्या “कवितेतली आई’ या कवितेला रोख ७ हजारांचे बक्षीस, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात आले. द्वितीय पारितोषिक हैदराबादच्या प्रमोद घोरपडे यांच्या कवितेला ५ हजार रोख दिले. ‘बुधवार पेठ, मातृत्व : वाट चालावी चालावी’ या कवितेला रसिकांची दाद मिळाली होती. सांगोल्याच्या प्रसाद सुहास लोखंडे यांच्या ‘गांधी’ या कवितेला तृतीय पारितोषिक मिळाले. ३ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शिवाय प्रत्येकी १ हजाराची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात अाली. इचलकरंजी येथील अक्षय मारुती इळके यांच्या ‘नागरिकत्व’ या कवितेला, तर पारनेर (जि. अहमदनगर) येथील सोमनाथ कोंडीभाऊ चौधरी यांच्या “माय सुपात सांडते’ या कवितांचा त्यात समावेश आहे. स्पर्धेत राज्यभरासह अन्य राज्यातील १७१ स्पर्धक सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.