आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन:लाइट,  साउंड शोने सावरकर गौरव यात्रेची उत्साहात सांगता

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेची सांगता बुधवारी गजानन महाराज मंदिरासमोर लाइट आणि साउंड शोने झाली. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन असल्याने यात्रेला विश्रांती राहील. ७ आणि ८ एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रा छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात राहील.छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील जयभवानीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून यात्रेला सुरुवात झाली होती. याप्रसंगी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, माजी महापौर बापू घडामोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सिडको एन-३, पुंडलिकनगर, गजानननगर आदी भागातून यात्रा गजानन महाराज मंदिर चौकात आली.

लाइट अँड साउंड शो संपल्यानंतर राम धून वाजवण्यात आली. या वेळी सहकारमंत्री अतुल सावे कार्यकर्त्यांसोबत श्रीरामाच्या गाण्यावर थिरकले. यात्रा सुरू होण्यापूर्वी जयभवानीनगर येथे प्रमुख कार्यकर्त्यांची भाषणे झाली. साउंड आणि लाइट शोमध्ये सर्वप्रथम सावरकर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, पांडुरंग आणि श्रीरामाची धून वाजविले गेले. त्यासंबंधीचे चलचित्रही दाखवण्यात आले.