आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासावरकरांनी बापूंच्या हत्येसाठी गोडसेला बंदूक पुरवली असा आरोप करणारे महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी या आरोपत्राला दिलेले उत्तर वाचले नसावे म्हणजे कमालच आहे, अशी प्रतिक्रिया सावरकर अभ्यासक आणि लेखक पार्थ बावस्कर यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.
तुषार गांधी यांनी एक ट्विट करून काही आरोप केले आहेत. या आरोपात काहीही तथ्य नाही. ते केवळ हास्यास्पद असल्याचे बावस्कर म्हणाले.
काय म्हणाले गांधी?
तुषार गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सावरकरांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंच्या हत्येसाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक पुरवली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत गोडसेकडे हत्या करण्यासाठी शस्त्र नव्हते, असा आरोप गांधी यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.
नथुराम म्हणतो की...
तुषार गांधी यांच्या आरोपावर सावरकर अभ्यासक आणि लेखक पार्थ बावस्कर म्हणाले की, नथुरामवर आरोपपत्राला उत्तर देताना क्रमांक 25 मध्ये सांगतो की, ‘दिल्लीच्या एका निर्वासिताकडून मी पिस्तुल विकत घेतले व त्याच पिस्तुलाने मी गांधींवर गोळ्या झाडल्या.’ मात्र, महात्मा गांधींचे पणतू असूनही तुषार गांधी यांनी हे आरोपपत्राला दिलेले उत्तर वाचलेले नसावे म्हणजे कमालच आहे, अशी प्रतिक्रिया बावस्कर यांनी दिली.
नेहरूंनी का प्रयत्न केले नाहीत?
बावस्कर पुढे म्हणाले की, गोपाळ गोडसे यांनी सांगितले आहे की, जरी नथुराम आणि नाना आपटे यांना सरकारने अटक केली असती, तरीही गांधीजींचा जीव वाचला नसता. इतके गांधीविरोधी वातावरण देशभर तयार झाले होते. सावरकर तर यावेळी मुंबईत होते. त्यामुळे त्यांचा आणि या प्रकरणचा संबंध जोडणे हास्यास्पद आहे, पण पंडित नेहरू तर दिल्लीत मुख्य पदावर होते ना? या सगळ्याची कल्पना पंडित नेहरूंना होती, असे असताना त्यांनी तरी गांधीजींचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, असा प्रश्न तुषार गांधी यांनी विचारायला हवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.